संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरातील वरची आळी येथे एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ओंकार दत्तात्रय शिंदे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने देवरूख शहरात खळबळ उडाली असून, शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बुधवारी सकाळी ओंकार याने राहत्या घरी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, ओंकारने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
ओंकार यांच्या पश्चात आई-वडील, बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. अवघ्या २८व्या वर्षी ओंकार यांचा झालेला मृत्यू कुटुंबीयांसाठी मोठा धक्का ठरला असून, त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवार आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













