रत्नागिरी शहरातील अवैध दारूविक्रीविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई करत मुरुगवाडा दांडा फिशरीजच्या मागील वरचीवाडी परिसरातून गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत २८ हजार ७१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, प्रशांत शिवराम नागवेकर (वय ६०, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिरामागे, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक हद्दीत गस्त घालत असताना वरचीवाडी परिसरात एका व्यक्तीकडे विक्रीसाठी गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत प्रशांत नागवेकर याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, हवालदार शांताराम झोरे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे सहभागी होते.
या प्रकरणी प्रशांत नागवेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९५१ च्या कलम ६५ (ई) अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
शहर परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













