चिपळूण तालुक्यातील वालोपे आणि पेढे येथून बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा अद्याप शोध लागलेला नाही. यातील एक व्यक्ती २०१९ पासून, तर दुसरी व्यक्ती गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही व्यक्तींबाबत काही माहिती मिळाल्यास चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वालोपे येथील विनोद आयरे बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील वालोपे देऊळवाडी येथील रहिवासी विनोद आयरे (वय ४७) हे ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाले. याप्रकरणी त्यांच्या पत्नी विजया विनोद आयरे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
पेढे येथून रेंटा हांसदा बेपत्ता
दुसऱ्या घटनेत, मूळचे पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील फतेपूर कालीतला येथील रहिवासी रेंटा हांसदा (वय ३६) हे चिपळूण तालुक्यातील पेढे येथून गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता आहेत. सध्या खेरशेत येथे राहणारे शंकर शांती सरकार यांनी याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नागरिकांकडून मिळणारी माहिती महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे संबंधित व्यक्ती कोणाला दिसल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास तातडीने चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













