Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

महाड : एसटी बसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

महाड येथे आज १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास महाडकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांना मोठी दुखापत झाल्याची माहिती नाही.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा वेग अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघातानंतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अपघात नेमका कशामुळे झाला, बसचा वेग किती होता आणि चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *