रत्नागिरी :कॉमन ऑफ घेण्यासाठी तीन विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

banner 468x60

रत्नागिरी शहरातील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये तीन प्रथम वर्षाचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विद्यार्थी आठ वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंगचा शिकार झाले आहेत.
पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी “कॉमन ऑफ” घेण्यासाठी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला, शिवीगाळ, धमक्या दिल्या आणि वारंवार वाद घालून असुरक्षितता निर्माण केली.

या प्रकरणामुळे महाविद्यालयीन वातावरणात तणाव वाढला आहे.
विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे लेखी तक्रार केली आणि शहर पोलीस ठाण्यातही निवेदन दिले आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, सततच्या त्रासामुळे त्यांना भीती आणि मानसिक ताण झाला आहे.


महाविद्यालय प्रशासनाने प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. दोषींवर शिस्तभंगाची कारवाई आणि पोलीस तपास होण्याची शक्यता आहे.


भारतामध्ये रॅगिंग हा गुन्हा आहे, ज्यासाठी निलंबन, हकालपट्टी, शिष्यवृत्ती रद्द किंवा पोलीस गुन्हा दाखल होऊ शकतो. ही घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुनःएकदा प्रकाश टाकते. हे आठ विद्यार्थी काही वेळा शिवीगाळ, धमक्या व वादविवादही करतात.

त्यामुळे आमच्यावर तणाव येऊन असुरक्षितता निर्माण झाली असल्याबाबतचे निवेदन त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *