Kokan  

मंडणगड : कारने 2 तरुणांना उडवले, अपघात CCTVत कैद

Screenshot

banner 468x60

मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवले. मात्र दोन्ही तरुण बोनेटवर आदळल्याने सुदैवाने बचावले.

कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, हा चित्तथरारक प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहरात सामान खरेदी करून दोन तरुण बसस्थानकाकडे जात असतानाच अचानक पाठीमागून आलेल्या कारने लागोपाठ दोन तरुणांना उडवले.

परंतु सुदैवाने दोन्ही तरुण गाडीच्या दर्शनी भाग बोनेटवर आदळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार भरधाव वेगात नसल्याने सुदैवाने दोन्ही तरुण बचावले आहेत.

परंतु तरुणांना उडवणाऱ्या कारचालकाला मात्र नागरिकाच्या रोशाला बळी पडावे लागले. काही काळ वातावरणही तंग झाले होते. मात्र काही लोकांच्या मदतीने प्रकरण निवळल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *