Breaking News
दापोली : दसऱ्यानिमित्त दापोलीत ऑनलाइन भोंडला स्पर्धा, दशानेमा गुजर युवक संस्थेचा उपक्रम, दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील महिलांना सहभागाची संधी चिपळूण : डी.बी.जे. कॉलेजसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसवा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी युवासेनेची मागणी, जुने गतिरोधक सपाट झाल्याने अपघाताचा धोका; राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला निवेदन चिपळूण : शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रुही खेडेकर चिपळुण : गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 48 हजारांचा मुद्देमाल नष्ट रत्नागिरीत नात्याला काळिमा, मावशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, भाचीवर अत्याचार, तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा

चिपळुण : गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 48 हजारांचा मुद्देमाल नष्ट

banner 468x60

चिपळूण तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, वालोपे येथील नदीकिनारी सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली. या कारवाईत गावठी दारू, दारूनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन आणि हातभट्टीचे साहित्य असा एकूण १ लाख ४८ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. कारवाईदरम्यान हा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.

चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक परिसरात नियमित गस्त घालत असताना वालोपे येथील नदीकिनारी गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. नदीकाठच्या दुर्गम भागात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर पोलिसांनी थेट कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली.

या छाप्यात तयार गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि हातभट्टी चालविण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी एकूण १ लाख ४८ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यानंतर कारवाईदरम्यान तो जागेवरच पूर्णपणे नष्ट करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

दरम्यान, चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. गावठी दारूची निर्मिती आणि विक्रीसारख्या बेकायदेशीर व्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

अवैध धंद्यांविरोधातील या कारवाईमुळे गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर पोलिसांची नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *