खेड शहरातील शिवाजीनगर परिसरात गार्डनजवळ रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर खड्ड्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली, तरी कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिवाजीनगर परिसरातील गार्डनजवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, या खड्ड्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. मात्र, केवळ तात्पुरती डागडुजी करून प्रश्न सुटणार का? पावसामुळे किंवा वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे पुन्हा खड्डा निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांकडून केला जात असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
आता संबंधित प्रशासन तात्पुरत्या मलमपट्टीपलीकडे जाऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे शिवाजीनगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













