चिपळूण : 49 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, सावर्डे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कोंडमळा निवाचीवाडी येथे ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वासुदेव बयाजी सावर्डेकर असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दारूच्या अतिव्यसनातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव बयाजी सावर्डेकर (वय ४०, रा. कोंडमळा निवाचीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत राहत्या घराच्या समोरील बाजूस असलेल्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सकाळी हा प्रकार कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत व्यक्तीचे पुतणे सुहास रघुनाथ सावर्डेकर यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २५/२०२६ नुसार नोंद केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *