खेड शहरातील बाजारपेठ परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत वाहने उभी केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी दोन वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. १६ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
पहिल्या घटनेत, खेड बाजारपेठेतील आशापुरा स्वीट्ससमोर एसटी बसस्थानक परिसरात हिरव्या रंगाची मालवाहू रिक्षा (क्र. एमएच ०८ ए क्यू ९९६४) रस्त्याच्या मध्यभागी उभी करण्यात आली होती. या वाहनामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसह पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशा स्थितीत रिक्षा उभी करून चालक निघून गेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अन्वर साजन तरायील पिटीकायिल (वय ३९, रा. साखरोली, ता. खेड) याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद महिला पोलीस शिपाई तेजस्विनी उमेश जाधव यांनी दिली.
दुसऱ्या घटनेत, खेड बाजारपेठेतील श्री गणेश सुपर मार्केटसमोर, वाणीपेठ परिसरात पांढऱ्या रंगाचा महिंद्रा सुपर प्रोफिट ट्रक (क्र. एमएच ०८ एपी ४३३३) रस्त्याच्या मध्यभागी उभा करण्यात आला होता. त्यामुळे वाहने आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशा स्थितीत ट्रक उभा करून चालक निघून गेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अमोल रामदास मोहिते (वय ४०, रा. वेताळवाडी, चिंचघर, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम २८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई आशिष बाबुराव पवार यांनी दिली.
सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने उभी केल्यास इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













