दापोली : अखेर ठरलं- दापोली पंचायत समिती सभापतीपदी उन्मेष राजे; उपसभापतीपदी नम्रता तोडणकर यांची वर्णी

banner 468x60

दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी उन्मेष रामचंद्र राजे तर उपसभापतीपदी नम्रता प्रदीप तोडणकर यांची निवड निश्चित झाली असून सोमवारी (दि. ९ मार्च) अधिकृत घोषणा होणार आहे. त्यानंतर दोघेही आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या दापोली तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांच्या निवडणुकीत मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे पंचायत समितीत शिवसेनेचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे.

त्यामुळे सभापतीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे दापोली तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर शिवसेना नेतृत्वाने सभापतीपदी उन्मेष रामचंद्र राजे तर उपसभापतीपदी नम्रता प्रदीप तोडणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

सोमवारी होणाऱ्या अधिकृत निवड प्रक्रियेनंतर दोघेही पदभार स्वीकारणार असून दापोली पंचायत समितीत नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *