दापोली : अपघातग्रस्ताच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

banner 468x60

दापोली तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महाळुंगे येथील युवक सुशांत दशरथ झिमण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या अपघातात सुशांत झिमण यांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सतत उपचार करण्यात येत आहेत. उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून आतापर्यंतचा आणि पुढील उपचारांचा मिळून अंदाजे १०.५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

मात्र, इतका मोठा वैद्यकीय खर्च पेलवणे कुटुंबासाठी अत्यंत कठीण ठरत असल्याने त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या वतीने सर्व सामाजिक बांधवांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. सुशांत यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज असून इच्छुकांनी दिलेल्या UPI/QR कोडद्वारे मदत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, सुशांत यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याने त्यांच्या उपचारासाठी तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य तेवढी मदत करून मानवतेचा हात पुढे करावा, तसेच हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *