रत्नागिरी शहरातील भाट्ये टेबल पॉईंट परिसरात गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना दोघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाट्ये टेबल पॉईंट येथील आई हॉटेलच्या बाजूला एका दगडाच्या आडोशाला साहिल शफिक मजावर (वय २२, रा. भाट्ये, दर्गा बस स्टॉप, रत्नागिरी) आणि सिद्धेश संतोष पावसकर (वय २४, रा. भाट्ये, खोतवाडी, रत्नागिरी) हे गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे बेकायदेशीरपणे सेवन करताना आढळून आले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दोघांविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २७ आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार शांताराम रामचंद्र झोरे (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा १ सप्टेंबर रोजी रात्री ८.३५ वाजता घडला असून, रात्री ११.३३ वाजता पोलिस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













