रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

banner 468x60

राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. जिल्ह्याच्या विकासकामांसह विविध योजनांच्या नियोजनाच्या अनुषंगाने या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

बैठकीबाबतची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *