Breaking News
संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू दापोली : आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा धोका, पर्यटकांना सावधगिरीचे आवाहन, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनाही सतर्कतेच्या सूचना चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली

संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तरुणाचा प्रकृती अचानक बिघडल्याने मृत्यू झाला आहे. मावस बहिणीच्या साखरपुडा समारंभासाठी कुटुंबासोबत नाणीज येथे गेलेल्या २८ वर्षीय तरुणाचा प्रकृती अचानक बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विनायक हरिश्चंद्र जाधव (वय २८, रा. तुळसणी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक जाधव हा आपल्या आई-वडिलांसोबत मावस बहिणीच्या साखरपुडा समारंभासाठी नाणीज येथे गेला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर तो आई-वडिलांसह रिक्षाने देवरुख येथे येण्यासाठी निघाला होता.


दरम्यान, नाणीज येथील जनामठ परिसरात रिक्षा आली असता विनायकला अचानक उलटीसारखे वाटू लागले. त्याची प्रकृती अस्वस्थ झाल्याने आई-वडिलांनी तातडीने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे दाखल केले.


रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.१० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडल्याची नोंद आकस्मिक मृत्यूच्या अहवालात करण्यात आली आहे. याप्रकरणी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४९ वाजता बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


विनायक जाधव यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तुळसणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होईल.