Breaking News
चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू दापोली : आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा धोका, पर्यटकांना सावधगिरीचे आवाहन, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनाही सतर्कतेच्या सूचना चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी

चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील पेढे-माळेवाडी येथून १८ वर्षे ६ महिन्यांची तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. रिया जगदीश चिवेलकर (वय १८ वर्षे ६ महिने, रा. पेढे, माळेवाडी, ता. चिपळूण) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश यशवंत चिवेलकर (वय ४७, रा. पेढे, माळेवाडी) यांनी दसऱ्याच्या सणापूर्वी मुलगी रियाला नवीन मोबाईल घेऊन दिला होता. मात्र, रिया या मोबाईलवर वारंवार चॅटिंग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर वडिलांनी तिला याबाबत समज दिली होती. तसेच तिच्याकडील मोबाईल काढून घेतला होता. या कारणावरून ती नाराज असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

दरम्यान, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास रिया घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही.

यानंतर तिच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५४/२०२६ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे पेढे-माळेवाडी परिसरात चर्चा सुरू झाली असून, बेपत्ता तरुणीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

दरम्यान, तरुणी स्वतःहून घरातून निघून गेली की तिच्या अपहरणामागे अन्य काही कारण आहे, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.