Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अखेर मुंबईतून शोध घेण्यात रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणातील संबंधित युवकाचाही पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलगी सुरक्षित असून, तिला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या सावर्डे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सावर्डे येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रभारी पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने सावर्डे येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या. अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, सुरेश कदम, सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलचंद मेंगडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहीम राबविण्यात आली.

सावर्डेत तणाव; कायदा व सुव्यवस्थेसाठी क्यूआरटी तैनात

१३ वर्षीय मुलीच्या अपहरणाच्या घटनेमुळे सावर्डे परिसरात चिंता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी क्यूआरटी (QRT) पथके तैनात केली होती. सावर्डे पोलीस, चिपळूण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली.

या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे शोधाचा विस्तार केला. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मुंबई येथे अपहृत मुलगी आणि संबंधित युवकाचा ठावठिकाणा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतून मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले, तसेच संबंधित युवकाला ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कामगिरी

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर तसेच पोलीस अंमलदार विजय आंबेकर, योगेश नावकर, वैभव मोरे, अतुल कांबळे, दीपक पाटील, गणेश सावंत आणि पांडुरंग भोरे यांचा सहभाग होता.

दरम्यान, मुलगी सुरक्षित मिळाल्यानंतर तिला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

अल्पवयीन मुलीचा मुंबईतून शोध लागल्याने सावर्डे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेमुळे मुलगी सुरक्षित मिळाल्याची माहिती समोर आली आहे.