दापोली : दापोली शिवाजीनगर येथून विवाहिता महिला बेपत्ता

banner 468x60

दापोली मधील शिवाजीनगर जुनी वसाहत येथून संगीता महेंद्र चौरंगी ही 36 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता चौरंगे सकाळी शिवाजीनगर येथून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिच्या घरामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरात तिच्या नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही.

त्यांचे पती महेंद्र चौरंगी यांनी दापोली पोलीस स्थानकात पत्नी,नापत्ता झाल्याची खबर दिली.


दापोली पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस हवालदार सुकाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *