दापोली : रत्नागिरी उत्तर भाजप जिल्हा चिटणीस संजय सावंत यांचा राजीनामा

banner 468x60

दापोली : रत्नागिरी उत्तर येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस संजय धोंडू सावंत यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दि. २५ मार्च २०२६ रोजी त्यांनी अधिकृतरित्या हा निर्णय जाहीर केला.

सावंत हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे तसेच पुढील वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पक्षात काम करताना मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, सावंत यांच्या या राजीनाम्यामुळे रत्नागिरी उत्तर भाजप संघटनेत चर्चेला उधाण आले असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *