Breaking News
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा, मुंबई-मडगावदरम्यान 4 अतिरिक्त विशेष गाड्या चिपळूण : रवींद्र सुर्वे खून प्रकरणात मुख्य आरोपीला हायकोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला दापोली : पंचायत समितीची वार्षिक आमसभा 10 सप्टेंबरला, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन, नागरिकांना निवेदने सादर करण्याचे आवाहन कोकण : ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तारखेत बदल 11 आणि 13 सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती रत्नागिरी : गणेशोत्सवात जिल्हावासियांची गैरसोय टाळा, रिक्षा स्टँडवर दरपत्रक लावा, घाट मार्गात यंत्रणा सज्ज ठेवा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे सर्व विभागांना सक्त निर्देश

दापोली : पंचायत समितीची वार्षिक आमसभा 10 सप्टेंबरला, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन, नागरिकांना निवेदने सादर करण्याचे आवाहन

banner 468x60

दापोली पंचायत समितीच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील वार्षिक आमसभा गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राधाकृष्ण मंदिर, दापोली येथे आयोजित करण्यात आली आहे. दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा पार पडणार आहे.

या आमसभेला दापोली तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.

आमसभेत तालुक्यातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या, विविध प्रशासकीय विषय तसेच स्थानिक मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी आपल्या समस्या थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्यांबाबतची निवेदने लेखी स्वरूपात पंचायत समिती दापोली कार्यालयात ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावीत. निवेदने पाच प्रतींमध्ये आणि प्रत्येक निवेदन स्वतंत्र A4 कागदावर सादर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही माहिती पंचायत समिती दापोलीचे सचिव, आमसभा तथा गटविकास अधिकारी (गट-अ) गणेश मंडलिक यांनी दिली. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्या वेळेत लेखी स्वरूपात प्रशासनापर्यंत पोहोचवून आमसभेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *