दापोली : सांस्कृतिक महोत्सवात निहारिका पिल्ले हिने पटकावला प्रथम क्रमांक

banner 468x60

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दापोली सांस्कृतिक महोत्सवा’त एकपात्री अभिनय स्पर्धेचा थरार रंगला.

या चुरशीच्या स्पर्धेत. निहारिका आनंदकुमार पिल्ले हिने आपल्या अष्टपैलू अभिनयाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.

कै. कृष्ण मामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर एकपात्री प्रयोग सादर केले.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला राजकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने:


योगेश कदम (गृहराज्यमंत्री), उमाताई खापरे (आमदार), देवदत्त नागे (प्रसिद्ध सिने अभिनेता – ‘जय मल्हार’ फेम), पद्मश्री दादा इदाते, कृपा घाग (नगराध्यक्षा), अर्चना बोंबे (तहसीलदार), अस्मिता केंद्रे (जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा), उन्मेष राजे (पंचायत समिती सभापती) याशिवाय प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन दादा पाटणे, निमंत्रक मिहीर महाजन, दिपक महाजन, इदाते सर आणि सर्व मान्यवर परीक्षक उपस्थित होते.

विजेत्या निहारिका पिल्ले हिच्या अभिनयाचे परीक्षण करताना उपस्थित मान्यवरांनी आणि विशेषतः अभिनेता देवदत्त नागे यांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. निहारिकाने सादर केलेल्या सादरीकरणातील भावाभिनय आणि संवादफेक प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १६ स्पर्धकांच्या जिद्दीचे आणि कलेचेही यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. दापोलीतील या संस्कृती महोत्सव मुले स्थानिक कलाकारांनी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *