रत्नागिरी – Ratnagiri : उधारीवर कपडे देण्यास नकार, दुकानदाराला गुंडाकडून तलवारीने जीवे मारण्याची धमकी

banner 468x60

एका गुंडाने दुकानदाराला तलवारीचा धाक दाखवून धमकावले असल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. रत्नागिरी शहरातील एका कपड्याच्या दुकानामध्ये स्थानिक गुंडाची दहशत पाहायला मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

banner 728x90 banner 728x90

शहरातील सन्मित्र नगर परिसरामध्ये गिरीश लोटणकर यांच्या मालकीचे कपड्याचे दुकान आहे. यावेळी दुपारच्या वेळेला नागेश गजबार याने दुकानात प्रवेश करून कपडे खरेदी केले. जवळपास दोन हजाराच्या घरात कपडे खरेदीचे बिल गेले.

आधी कपडे घेऊन जातो बिल नंतर देतो असं नागेश गजबार या लोकल गुंडाचं म्हणणं होतं. पण दुकानदाराने त्याला विरोध केला. त्यानंतर नागेश पुन्हा संध्याकाळी दुकानात हातात तलवार घेऊन आला.

तलवारीचा धाक दाखवून त्याने बघून घेण्याची भाषा केली. दरम्यान दुकान मालकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

या गोष्टीची माहिती मिळताच गुंड सचिन याने दुकान मालकाला फोन करून बघून घेण्याची भाषा केली आहे. याबाबत पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून अशा गुंडगिरीला कायमचा चाप बसवा अशी मागणी सध्या व्यापाऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *