प्रवाशांसाठी खुशखबर ! ख्रिसमस / नवीन वर्षात गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मडगाव जंक्शन ते पनवेल दरम्यान अजून काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
१) गाडी क्रमांक 01428/01427 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्रमांक 01428 मडगाव जं. – पनवेल विशेष
ही गाडी मडगाव जंक्शन येथून दिनांक 22/12/2023, 23/12/2023, 24/12/2023, 29/12/2023, 30/12/2023 आणि 31/12/2023 रोजी सकाळी 08:00 वाजता सुटून ट्रेन त्याच दिवशी रात्री 20:15 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01427 पनवेल – मडगाव जं. विशेष
ही गाडी पनवेल येथून दिनांक 22/12/2023, 23/12/2023, 24/12/2023, 29/12/2023, 30/12/2023 आणि 31/12/2023 रोजी रात्री 21:10 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी मडगाव स्थानकावर सकाळी 06:50 वाजता पोहोचेल.
या गाड्या करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकांवर थांबतील.
रचना : एकूण 22 एलएचबी कोच : इकॉनॉमी थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 04 कोच, जनरल – 10 कोच, एसएलआर – 02.
२) गाडी क्रमांक 01430/01429 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्रमांक 01430 मडगाव जं. – पनवेल विशेष
ही गाडी मडगाव जंक्शन येथून दिनांक 01/01/2024 रोजी रात्री 21:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 07:20 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01429 पनवेल – मडगाव जं. विशेष
ही गाडी येथून दिनांक 02/01/2023 रोजी सकाळी 08:20 वाजता पनवेल येथून सुटेल ती मडगाव जंक्शनला त्याच दिवशी रात्री रात्री 21:30 वाजता पोहोचेल.
या गाड्या करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकांवर थांबतील.
रचना :एकूण 22 एलएचबी कोच : इकॉनॉमी थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 04 कोच, जनरल – 10 कोच, एसएलआर – 02.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















