खोकल्याचे औषध समजून चक्क विषारी औषध प्राशन केल्याने ३९ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. केशव दामोदर चौगुले (३९, रा. कोठारवाडी, कोळीसरे तालुका रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे या ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणाने खोकल्याचे औषध प्राशन करत चक्क गवत मारण्याचे विषारी बाटलीतील औषधे प्यायल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
३ डिसेंबर रोजी सकाळी ०९.३० च्या सुमारास खोकल्याचे औषध समजून गवत मारण्याचे प्यायल्याने त्याला त्रास होवू लागला. हा तरुण अस्वस्थ झाल्याने त्याला तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गावाजवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले. अधिक उपचारासाठी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना या तरुणाचे तब्बल पाच दिवसानंतर दुर्दैवीरित्या निधन झाले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर आय.सी.यू. विभागामध्ये उपचार सुरु होते.
घरीच असलेल्या केशवच्या हातून झालेली ही चूक त्याच्यासाठी जीवघेणी ठरली असून हा प्रकार नेमका अनावधानाने घडला की कसा याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या केशवचे कुटुंब त्याच्यासोबत राहत नव्हते, अशी प्राथमिक माहिती जयगड पोलिसांना मिळाली आहे.
त्यामुळे हा सगळा प्रकार काही कौटुंबिक वादातून झाला किंवा कसा या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत. या सगळ्या धक्कादायक घटनेची नोंद रत्नागिरी जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. या घटनेचा तपास रत्नागिरी जयगड पोलीस करत असून अद्याप या घटनेमागील नेमकं कारण समोर आलेले नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*