शहरातील जयस्तंभ ते बसस्थानक येथून डाव्याबाजूच्या वाहतूकीला जलाराम व अंबिका ट्रेडर्स समोर रस्त्यावर पार्क केलेल्या चार दुचाकी व रिक्षाला टेम्पोने धडक दिली.
या अपघातामध्ये चार दुचाकीसह रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच टेम्पो चालकाने पलायन केले आहे.
शहर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरु होती.
ही घटना गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वा कालावधीत जलाराम व अंबिका ट्रेडर्स येथील रस्त्यावर घडली. अज्ञात टेम्पो चालक आपल्या ताब्यातील टेम्पो ( एमएच-०८ एपी ४४००) हा बसस्थानकहून जयस्तंभ येथे जात असताना त्याने दुकानाच्या समोर पार्क केलेल्या चार दुचाकी व एका रिक्षाला धडक दिली.
या अपघातानंतर टेम्पो चालकाने पलायन केले. मात्र अपघात ग्रस्त वाहन धारकांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. उशिरा पर्यत शहर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल कऱण्याची कार्यवाही सुरु होती.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















