सिंधुदुर्ग : लोकसभेसाठी भाजपचे प्रमोद जठार उत्सुक

banner 468x60

भाजपच्या प्रमोद जठारांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ताकाला जाऊन भांड कशाला लपवू असं म्हणत महायुतीने संधी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढू असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

banner 728x90 banner 728x90

त्यामुळे भाजपच्या निलेश राणे, शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र सामंत यांच्यानंतर आता प्रमोद जठारांच्या नावाचीही इच्छुकांच्या यादीत भर पडली आहे.

ताकाला जाताना भांड कशाला लपवायचे? असं म्हणत महायुतीने विश्वास दाखवल्यास मी दिल्लीत निवडून जाईन असं वक्तव्य भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी केलं आहे.

मागची दोन टर्म भाजपने विनायक राऊत यांना अडीच लाख मते देऊन खासदार केलं.मात्र विनायक राऊत यांनी एकही रोजगार किंवा प्रकल्प आणला नाही, विनायक राऊत यांनी मुंबईतील खंबाठा प्रकल्पाचे वाटोळे केले अशी टीकाही त्यानी केली.
विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाचा खंबाटा केला, आता कोकणचा खंबाटा होऊ नये म्हणून विनायक राऊत यांना हटवावे लागणार असं प्रमोद जठार म्हणाले. रत्नागिरी- सिंधुदु्र्गमध्ये कमळाचा खासदार निवडून आला तर आम्ही दोन लाख रोजगार मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं.

कोकणात ग्रीन फिल्ड प्रकल्प झाल्यास आर्थिक आणि पर्यटन राजधानीला जोडणारा कोकण भविष्यात देशाची आर्थिक राजधानी होईल असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला. निलेश राणे लोकसभेसाठी उत्सुक?


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी एक ट्विट करत आपण अचानक राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू होत्या.

राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय 24 तासांमध्ये मागे घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *