भाट्ये येथे बुधवारी रात्री झालेल्या राड्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. मटक्याची चिठ्ठी घेण्याच्या वादातून भाट्ये पुलाजवळ तेथील काहींनी एका भैय्याला चांगलाच धुतला.
परंतु याबाबत शहर पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शहराजवळ असलेल्या एका गावातील हा भैय्या आता मटका व्यवसायात उतरला आहे.
मटक्याची ”चिठ्ठी” नेहमीच्या व्यक्तीऐवजी दुसऱ्याला दिल्याच्या रागामधून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू होती. ”भैय्या” नामक व्यक्तीकडे चिठ्ठी देणाऱ्याने दुसऱ्याच व्यक्तीला चिठ्ठी दिल्यामुळे भैया प्रचंड संतापला. रात्री भैयाने संबंधिताला मोबाईलवरून अत्यंत खालच्या शब्दात शिवीगाळ केली.
आपले कोणीच काही करू शकत नाही या अविर्भावात ”भैय्या” थेट भाट्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेला. याठिकाणी संबंधित व्यक्तीला त्याने घराजवळ जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भैय्याला ती व्यक्ती भिडली.
एक एक करत अनेकजण तेथे आले. त्या व्यक्तीसह कुटुंबियांनी भैय्याला धु…धु… धुतल्याची चर्चा दोन दिवस सुरू आहे. या घटनेनंतर भैया पोलिस ठाण्यातही गेला. परंतु, मटक्याच्या चिठ्ठीवरून वाद झाल्याची तक्रार द्यायची कशी, असा प्रश्न पडल्याने भैय्या हताश होऊन माघारी परतल्याचेही चर्चा सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















