शहरातील जयस्तंभ येथे एका भरधाव मोटारीने तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये जिल्हा न्यायालयाच्या मोटारीसह अन्य २ वाहनांचा समावेश आहे.
यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. अपघातानंतर धडक देणाऱ्यांनी पोबारा केला.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सांगलीतील मोटारचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीधर माणिक पाटील (रा. सुरूल, ता. वाळवा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित चालकाचे नाव आहे. साईराज राजकुमार शर्मा (२४, रा. आजगावकरवाडी जयस्तंभ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल सायंकाळी सव्वा सात वाजता शर्मा हे मित्र अनिल राठोड (जयस्तंभ) यांच्यासोबत पालिकेसमोर उभे होते. एवढ्यात लाल रंगाची मोटार (एमएच ४३ आर ९६१६) ने जेलनाका ते चवंडे वठार, अशी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता चालवून शर्मा यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात त्यांची आई सारिका शर्मा यांच्या पायाला दुखापत झाली. दुचाकीला धडक दिल्यानंतर भरधाव मोटार (एमएच ०८ एक्स ०५६१) आणि जिल्हा न्यायालय असे लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोटारला (एमएच ०८ एएक्स ४४८९) ठोकर दिली.
या पद्धतीने ३ वाहनांना धडक देऊन एका महिलेला जखमी केले. तसेच वाहनांचे नुकसान करून संशयित पाटीलने तेथून पलायन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















