सिंधुदुर्ग : बातमी लावल्याप्रकरणी मुजोर डॉक्टर अर्पिता आचरेकरनी दिली पत्रकाराला धमकी, मुजोर डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

भगवान लोके

banner 468x60

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बातमी लावल्याप्रकरणी मुजोर डॉक्टर अर्पिता आचरेकरनी पत्रकाराला धमकी दिली आहे. मुजोर डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसूतीसाठी करावी लागतेय वणवण
अशा स्वरूपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमातून देण्यात आली होती.

banner 728x90 banner 728x90

या डिजिटल माध्यमाचे प्रतिनिधी भगवान लोके यांना फोन करून अपमानास्पद बोलत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या मुजोर स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अर्पिता महेंद्र आचरेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती

आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 चे कलम ४ तसेच भादवी कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल केला गेला असल्याचं म्हटलं जातंय .

या प्रकाराचा सर्वत्र निषेद केला जातोय. पत्रकाराला अशी धमकी देणं आणि ते ही शासकीय अधिकाऱ्यांनी याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *