ठाकरे गट शिवसेना ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे नेते अरुण दुधवडकर यांच्याकडे दिला.
पत्रकात पावसकर यांनी म्हटले आहे की, मी गेली काही वर्षे ठाकरे शिवसेना ओबीसी सेलच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख या पदावर काम करत आहे.
माझी नियुक्ती झाल्यापासून मी पक्षाला उभारी देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ओबीसी सेलचा जिल्हाप्रमुख म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र फिरून संघटना वाढविली; परंतु पक्षातील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला आता मी कंटाळलो आहे.
अंतर्गत राजकारणामुळे काम करण्याचा उत्साह राहत नाही.नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून मी प्रामाणिक आणि हिरीरीने काम करत आहे. मतदारसंघातील संघटनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी पदरमोड करून काम करत आहे.
असे असताना मतदारसंघातील काही महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठ नेत्यांनी मला व प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते;
परंतु तसे होताना दिसून येत नाही. असे प्रकार नेहमीच होत असल्याने मनाला वेदना होतात. त्यामुळे आज मी माझ्या पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















