रत्नागिरी : ठेकेदाराला चार जणांनी केली हॉकीच्या स्टीकने मारहाण , चौघांवर गुन्हा

banner 468x60

शहरातील चर्मालय ते भाटीमिऱ्या अलावा येथे चारजणांनी ठेकेदाराला शिवीगाळ व हॉकीस्टीकने मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात त्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानस कीर (वय ३०, रा. अभ्युदयनगर, रत्नागिरी) व अन्य तीन मानसचे मित्र असे संशयित आहेत. (नाव, गाव माहीत नाही.) ही घटना सोमवारी (ता. ६) सायंकाळी शहरातील चर्मालय ते भाटीमिऱ्या अलावा येथील दत्तमंदिर जवळील मोकळ्या मैदानात घडली.

banner 728x90 banner 728x90


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन मधुकर वाडकर (वय ३९, रा. गयाळवाडी, मुळ. निढळेवाडी, ता. संगमेश्वर) हे व संशयित मानस कीर व त्याचे तीन मित्र हॉटेलमधून बाहेर पडले.

त्यानंतर सचिन वाडकर व त्यांचे तीन मित्र चारचाकी गाडीमध्ये बसले. मानस कीर व त्यांच्या मित्रांनी सचिन वाडकर यांच्या नाकावर, चेहऱ्यावर हाताच्या ठोशाने मारहाण करून त्याला चाररस्ता चर्मालय येथे सोडले.

त्यानंतर तक्रारदार हे मिस्त्री व्हिला येथे आले असता पुन्हा मानस कीर व त्याच्या मित्रांनी सचिनला हॉकीच्या स्टीकने मारहाण केली. मानस यांनी अलावा दत्तमंदिर जवळील मोकळ्या मैदानात नेऊन पुन्हा मारहाण केली, या मारहाणीत सचिन वाडकर जखमी झाले. त्यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *