Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

रत्नागिरी : जिल्ह्यात शिंदेचीच शिवसेना, गावपॅनेलची सरशी, ठाकरे गटाला मिळाली केवळ 1 जागा

banner 468x60

जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चार ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला तर चार ग्रामपंचायतींमध्ये गावपॅनेलला विजय मिळाला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी १ ग्रामपंचायत मिळाली आहे. दरम्यान, ठाकरे शिवसेनेकडून सोशल मीडियावर मात्र यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा दावा केला जात आहे.

banner 728x90

मंडणगड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत शिवसेनेला तर एक ग्रामपंचायत गावपॅनेलला मिळाली आहे. मात्र सोशल मीडियावरुन ठाकरे शिवसेना या दोन्ही ग्रामपंचायती आपल्याच असल्याचा दावा करत आहे. दापोली तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती शिवसेनेला मिळाल्या आहेत.

ठाकरे शिवसेनेला एकाच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. चिपळुणातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तीनही ठिकाणी गावपॅनेलला सत्ता मिळाली आहे.

मात्र यातील दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. देवरुखमध्ये एका ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि ती भाजपने जिंकली आहे. याआधी ही ग्रामपंचायत ठाकरे शिवसेनेकडे होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *