रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी ओरी विभागातील युवानेते प्रतीक देसाई यांची रत्नागिरी तालुका उत्तर विभागाच्या युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
देसाई हे सामाजिक कार्यकर्ते असून, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत लोकोपयोगी कामं केली आहेत. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी झोकून काम केलं आहे. करोना कालावधीत त्यांनी अनेक गरजवंतांना सढळ हाताने मदतीचा हात दिला आहे.
त्यांच्या सामाजिक दखल घेऊन भाजपने देसाई यांची रत्नागिरी तालुक्याच्या उत्तर विभागाच्या युवाध्यक्षपदी निवड केलीय. बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांना अधिकृत पत्र दिलं आहे. प्रतीक देसाई यांचे सरचिटणीस उमेश देसाई, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनी अभिनंदन केलंय.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















