Breaking News
रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू लांजा : उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत महामार्ग मजुराचा जागीच मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल लांजा : एसटी चालकाचा प्रामाणिकपणा, सात लाखांचे दागिने प्रवाशाला सुखरूप परतलांजा-कल्याण प्रवासादरम्यान बसमध्ये राहिली मौल्यवान दागिन्यांची बॅग, गणेशोत्सवाच्या गर्दीतही चालकाने जपली माणुसकी चिपळूण : चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, पोट फुगल्याने उपचारासाठी नेत असताना प्रकृती बिघडली दापोलीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीदापोली, खेड, मंडणगडचा समावेश, उत्तर रत्नागिरीतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
Kokan  

खेड : लोटे-पटवर्धन परिसरात कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, मटका जुगाराचे आकडे लिहिलेल्या पावती पुस्तकासह मुद्देमाल जप्त

banner 468x60

खेड तालुक्यातील लोटे-पटवर्धन परिसरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याची कारवाई खेड पोलिसांनी केली. रुक्मिणी निवास या इमारतीच्या आडोशाला जुगाराचे आकडे घेऊन लोकांकडून पैसे स्वीकारणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पावती पुस्तक, बॉलपेन आणि रोख रक्कम असा एकूण ९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे रुक्मिणी निवास बिल्डिंगच्या आडोशाला, पटवर्धन-लोटे, ता. खेड येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सुरेश चव्हाण (रा. सध्या पिरलोटे, ता. खेड; मूळ रा. वाणीवाडी, कडवई, ता. संगमेश्वर) हा दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या ‘कल्याण मटका’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मटका जुगाराच्या आकड्यांवर लोकांकडून पैसे स्वीकारताना आढळून आला.

कारवाईदरम्यान पोलिसांना त्याच्याकडे १० रुपयांचे पावती पुस्तक आढळले. हे पुस्तक स्टेपलरच्या पिना मारून तयार केलेले असून त्यामध्ये कार्बन पेपर लावलेला होता. पावती पुस्तकाला पांढऱ्या आणि लाल रंगाची पाने असून, त्यावर सिरियल नंबर तसेच इंग्रजीमध्ये ‘कल्याण’ असे लिहिलेले होते. त्याखाली जुगाराचे आकडे आणि त्यापुढे पैशांची रक्कम लिहिलेली असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

तसेच त्याच्याकडून ५ रुपयांचा निळ्या रंगाचा बॉलपेन आणि ९७० रुपये रोख जप्त करण्यात आले. या रोख रकमेत २०० रुपयांची एक नोट, १०० रुपयांच्या सात नोटा, ५० रुपयांची एक नोट आणि २० रुपयांची एक नोट यांचा समावेश आहे.

या कारवाईप्रकरणी खेड पोलीस ठाण्याअंतर्गत लोटे पोलीस दुरक्षेत्रातील पोलीस कॉन्स्टेबल सुहास हिंदुराव पाटील (ब.नं. ७४०) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१७/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.१२ वाजता दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *