राजापूर तालुक्यातील तेरवण खालचीवाडी येथे ५० वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत घराच्या वाश्याला गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अनिल लक्ष्मण सावंत (वय ५०, रा. तेरवण खालचीवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, अनिल सावंत हे दारूचे अतिव्यसनी होते. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्यापूर्वी त्यांनी दारूच्या नशेत घराच्या वाश्याला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही बाब लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी त्यांना खाली उतरवले आणि तातडीने उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५६/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











