चिपळूण : सार्वजनिक रस्त्यावर वाहने लावून अडथळा, तीन चालकांवर गुन्हे

banner 468x60

चिपळूण येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या तीन चालकांविरोधात चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे. १५ सप्टेंबर रोजी खेर्डी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या.

पहिली घटना दुपारी सुमारे १२.१५ वाजता खेर्डी येथील ए. के. क्राउन बिल्डिंगसमोर घडली. संदेश शिवराम पाथरवट (वय ३२, रा. खेर्डी, स्टेट बँकेच्या मागे, ता. चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील आयशर प्रो ३०१८ (MH 43 CK 9567) हे वाहन चिपळूण-कराडकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीने उभे केले की, ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशा स्थितीत वाहन सोडून तो निघून गेल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २८९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना खेर्डी बाजारपेठेतील दत्त राईस मिलसमोर सकाळी सुमारे ११.४० वाजता घडली. सागर शंकर काळे (वय ४०, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड) याने त्याच्या ताब्यातील टाटा ६१० टेम्पो (MH 08 AP 5051) सार्वजनिक रस्त्यावर उभा केला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २८८/२०२६ दाखल करण्यात आला.

तिसरी घटना खेर्डी येथील ओमेगा हॉटेलसमोर दुपारी सुमारे १.०१ वाजता घडली. मनोज सयाजी जगदाळे (वय ३४, रा. खेर्डी वरचीपेठ, ता. चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप (MH 08 AP 1925) सार्वजनिक रस्त्यावर उभी केली. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन पादचाऱ्यांना धोका निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २९१/२०२६ दाखल करण्यात आला.

तिन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *