Breaking News
रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू लांजा : उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत महामार्ग मजुराचा जागीच मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल लांजा : एसटी चालकाचा प्रामाणिकपणा, सात लाखांचे दागिने प्रवाशाला सुखरूप परतलांजा-कल्याण प्रवासादरम्यान बसमध्ये राहिली मौल्यवान दागिन्यांची बॅग, गणेशोत्सवाच्या गर्दीतही चालकाने जपली माणुसकी चिपळूण : चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, पोट फुगल्याने उपचारासाठी नेत असताना प्रकृती बिघडली दापोलीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीदापोली, खेड, मंडणगडचा समावेश, उत्तर रत्नागिरीतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

चिपळूण : चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, पोट फुगल्याने उपचारासाठी नेत असताना प्रकृती बिघडली

banner 468x60

पोटात गॅसचा त्रास होत असल्याने उपचार घेणाऱ्या चार वर्षे पाच महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. निर्वी निलेश भुवड (वय ४ वर्षे ५ महिने, रा. नांदगाव, ता. चिपळूण) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वी हिच्या पोटात गॅसचा त्रास होत असल्याने १६ सप्टेंबर रोजी तिच्यावर चिपळूण येथील डॉ. मनियार यांच्याकडे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ती आई-वडिलांसोबत वडिलांच्या सासरी तळवली आगरवाडी, ता. गुहागर येथे गेली होती.

दरम्यान, रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास निर्वी रडू लागली. तिचे पोट फुगल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिला स्थानिक डॉक्टर डॉ. आशिष चौगुले यांच्याकडे दाखविण्यात आले. त्यांनी पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता निर्वीला तळवली येथून घेऊन कुटुंबीय कामथे उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना झाले. रात्री सुमारे १.३० वाजता तिला उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर निर्वी हिला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी सुरुवातीला चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी गुहागर पोलीस ठाण्यात अ.मृ. क्रमांक ४०/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

चिमुकलीच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत पुढील वैद्यकीय व पोलिस तपासानंतर अधिक स्पष्टता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *