रत्नागिरी जयगड येथील सडेवाडी परिसरात घरात ठेवलेल्या बॉक्समधून तब्बल ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घरात टीव्ही पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तीविरोधात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ही चोरी झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. सौ. तेजस्वीनी संकेत वाघधरे (वय ३५, रा. सडेवाडी, जयगड) यांच्या घरातील कपाटात ठेवलेल्या बॉक्समध्ये सोन्याचे दागिने होते.
या कालावधीत आरोपी निलेश नारायण पाटील (वय ४५, मूळ रा. कोळंबे, सध्या रा. जयगड सडेवाडी) हा फिर्यादीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादीच्या नकळत आणि संमतीशिवाय बॉक्समधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील कुडी (१२,५०० रुपये), ३.५ ग्रॅम सोन्याच्या कानातील पट्ट्या (१७,५०० रुपये), ३ ग्रॅम वजनाचे साईबाबांचे दोन लॉकेट (१२,५०० रुपये), ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन (२५,००० रुपये), १ ग्रॅम सोन्याची अंगठी (५,००० रुपये), १ ग्रॅम मुलांची सोन्याची कानातील रिंग (५,००० रुपये) आणि ३ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (१५,००० रुपये) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४/२०२६, भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची तक्रार २१ सप्टेंबर रोजी रात्री ८.५९ वाजता दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













