Breaking News
रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू लांजा : उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत महामार्ग मजुराचा जागीच मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल लांजा : एसटी चालकाचा प्रामाणिकपणा, सात लाखांचे दागिने प्रवाशाला सुखरूप परतलांजा-कल्याण प्रवासादरम्यान बसमध्ये राहिली मौल्यवान दागिन्यांची बॅग, गणेशोत्सवाच्या गर्दीतही चालकाने जपली माणुसकी चिपळूण : चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, पोट फुगल्याने उपचारासाठी नेत असताना प्रकृती बिघडली दापोलीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीदापोली, खेड, मंडणगडचा समावेश, उत्तर रत्नागिरीतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

लांजा : उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत महामार्ग मजुराचा जागीच मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुराला भरधाव महिंद्रा कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मजुराचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावरील पिअर क्रमांक ३ नजीक ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात गोपाल मुरमु (वय ४५ वर्षे, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) यांचा मृत्यू झाला आहे.


घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामावरील प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन (वय ३४) यांच्या देखरेखीखाली गोपाल मुरमु हे लांजा उड्डाणपुलावर ड्रेनेजचे काम करत होते. त्याचवेळी महिंद्रा कंपनीची कार (क्र. केए.०३.एसी.३६००) घेऊन चालक मौला कासम शेख (वय ३८, मूळ रा. अक्कलकोट, सोलापूर, सध्या रा. मुस्त्रगवाडा, रत्नागिरी) हा भरधाव वेगाने जात होता. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि अतिवेगात वाहन चालवत त्याने पुलावर काम करणाऱ्या गोपाल मुरमु यांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत मुरमु हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर संबंधित कारचालक जखमीला कोणतीही मदत न करता अथवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला.


या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक मौला कासम शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक पथकामार्फत घटनास्थळाची पाहणी केली असून गुन्हा दाखल करतेवेळी चित्रीकरणही करण्यात आले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *