खेड : रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलविरोधात अनुज जोशी यांचं बेमुदत धरणे आंदोलन, अधिकृत मान्यतेसह कारभाराच्या चौकशीची मागणी

banner 468x60

खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या अधिकृत मान्यतेचा प्रश्न उपस्थित करत तसेच शाळा व्यवस्थापनाच्या कथित कारभाराविरोधात पालक अनुज जोशी यांनी २ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मुलीच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करत जोशी यांनी शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

शाळेला शासनाची रीतसर मान्यता असल्यास त्यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे व पुरावे सार्वजनिक करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलनकर्ते अनुज जोशी यांनी केली आहे. तसेच शाळेकडून कथित बोगस पावत्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे शाळेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी अनुज जोशी यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आणि त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. प्रशासनाकडून योग्य चौकशी आणि कारवाई न झाल्यास २ सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यावेळी देण्यात आला होता.

त्यानुसार, शिक्षण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करत जोशी यांनी अखेर २ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित हा विषय असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शाळेची मान्यता, पावत्या तसेच व्यवस्थापनाच्या कारभाराची चौकशी करावी आणि सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी आंदोलनकर्त्याकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *