रत्नागिरी जिल्ह्यात संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुढील दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार इंधन पुरवठा करणारी वाहने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात आली असून त्यांच्या वाहतुकीत कोणताही अडथळा आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या अधिकृत वाहनांना जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरून मुक्त संचाराचा अधिकार देण्यात आला आहे.
तसेच, या वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. इंधन वाहतूक रोखणे, मार्ग अडवणे किंवा चालकांना धमकावणे यासारख्या प्रकारांना कठोरपणे प्रतिबंध करण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कलमान्वये कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













