रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत कुमारी वेदा विजय पाडावे हिने उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर तिचे कौतुक होत आहे.
वेदा ही भा. शिर्के प्रशाला येथील विद्यार्थिनी असून, इयत्ता ८ वी ते १० वी या गटात तिने आपल्या उत्कृष्ट कलाकृतीच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर आधारित चित्रातून तिने प्रभावी संदेश दिला, ज्यामुळे तिला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला.
नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले होते. त्याचाच एक भाग म्हणून ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, वेदा विजय पाडावे आणि इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ रत्नागिरी नगरपरिषदेचे सभागृह येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात ‘स्वच्छता चॅम्पियन’, ‘पर्यावरण दूत’ आणि ‘स्वच्छता ब्रँड अँबेसिडर’ यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
वेदाच्या या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक तसेच नगरपरिषद प्रशासनाने तिचे अभिनंदन केले असून, भविष्यातही ती अशाच प्रकारे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













