रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचे चित्रीकरण करत संबंधित व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घडला. राजिवडा परिसरातील जुबेर सलीम शेख (२२) आणि मुस्तकीन गडकरी (२४) यांनी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगा भीतीमुळे सुरुवातीला गप्प राहिला होता. मात्र आरोपींनी संबंधित कृत्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
गुरुवारी (१२ मार्च) पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास संबंधित व्हिडिओ आला. व्हिडिओतील मुलगा स्वतःचा मुलगा असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ
हालचाल करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गतही स्वतंत्र कलमे लावण्यात आली आहेत.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्वतःकडे घेतली असून आरोपींनी संबंधित व्हिडिओ इतरत्र प्रसारित केला आहे का तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














