दापोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 53.87 टक्के मतदान, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

banner 468x60

दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काल दिनांक ०७ फेब्रुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १ लाख ४० हजार ५५८ मतदारांपैकी ७५ हजार ७१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाची टक्केवारी ५३.८७ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे.


यामध्ये पुरुष मतदार ३५ हजार ६३६, तर महिला मतदार ४० हजार ०७९ इतक्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मतदानातील सहभाग लक्षणीय असल्याचे चित्र दिसून आले.
तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून आली. काही ठिकाणी दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचेही पाहायला मिळाले. प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली होती.


आता सर्वांचे लक्ष ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, दापोली तालुक्याच्या राजकीय चित्रावर कोणत्या पक्षाला बहुमत व कोण निवडून येणार याची उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *