दापोली : जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानाची टक्केवारी 39.79 टक्के

banner 468x60

दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 या वेळेत मतदान घेण्यात आले.


दापोली पंचायत समिती अंतर्गत एकूण 1,40,558 मतदार नोंदणीकृत होते. यामध्ये 66,667 पुरुष व 73,891 महिला मतदारांचा समावेश होता. मात्र प्रत्यक्ष मतदानासाठी 55,932 मतदारांनी आपला हक्क बजावला.
मतदानात
26,405 पुरुष,
29,527 महिला मतदारांनी सहभाग घेतला.
यामुळे दापोली पंचायत समितीची एकूण मतदानाची टक्केवारी 39.79% इतकी नोंदवली गेली आहे. महिलांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *