Breaking News
रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू लांजा : उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत महामार्ग मजुराचा जागीच मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल लांजा : एसटी चालकाचा प्रामाणिकपणा, सात लाखांचे दागिने प्रवाशाला सुखरूप परतलांजा-कल्याण प्रवासादरम्यान बसमध्ये राहिली मौल्यवान दागिन्यांची बॅग, गणेशोत्सवाच्या गर्दीतही चालकाने जपली माणुसकी चिपळूण : चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, पोट फुगल्याने उपचारासाठी नेत असताना प्रकृती बिघडली दापोलीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीदापोली, खेड, मंडणगडचा समावेश, उत्तर रत्नागिरीतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

संगमेश्वर : पालकर फाऊंडेशनच्या काउंटरमधून 50 हजार 200 रुपयांची चोरी

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील विघ्नवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशनमध्ये जमा असलेल्या रोकडीतून ५० हजार २०० रुपये चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. फाऊंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक विभागाच्या काउंटरमधून ही रोकड लंपास झाल्याची तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पालकर फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्रीकृष्ण धोंडू पालेकर यांनी देवरुख पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विघ्नवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशनमध्ये ही घटना घडली.

फाऊंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक विभागाच्या काउंटरवर त्या वेळी एकूण ७८ हजार ८०० रुपये जमा होते. याच रकमेतून ५० हजार २०० रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या १०० नोटा आणि २०० रुपयांची एक नोट, अशा एकूण ५० हजार २०० रुपयांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात राकेश एकनाथ मेस्त्री याच्यावर रोकड चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काउंटरवरील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फाऊंडेशन व्यवस्थापक श्रीकृष्ण पालेकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत २२ सप्टेंबर २०२६ रोजी राकेश मेस्त्री याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३ व ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

चोरीची रक्कम, घटना नेमकी कशी घडली तसेच चोरीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *