Breaking News

रत्नागिरी : भाटये येथे अंमली पदार्थ सेवन करताना तरुणाला ताब्यात , सिगारेटचे अर्धवट थोटूक व लायटर जप्त

banner 468x60

रत्नागिरी शहर पोलिसांनी भाटये-मरकरवाडी परिसरात अंमली पदार्थ सेवनाच्या संशयावरून एका तरुणाविरुद्ध कारवाई केली. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी भाटये, मरकरवाडी स्टॉपजवळ बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत स्ट्रीट लाईटच्या खांबाखाली मर्जान अब्दुल्ला तांडेल (३०, रा. राजीवडा नाक्याजवळ, रत्नागिरी) हा अंमली पदार्थ सेवन करताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

त्याच्याकडे अंमली पदार्थ सेवनासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत एक सिगारेटचे अर्धवट जळालेले थोटूक आणि पिवळ्या रंगाचे एक लायटर, असा एकूण १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम अंबाजी पाटील यांनी फिर्याद दिली असून, गु.र.नं. ३६०/२०२६ नुसार १९ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *