Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

मंडणगडमध्ये धक्कादायक घटना, पती साप हाकलण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील भिंगळोली आदिवासीवाडी येथे एका ४० वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंडणगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना हरिश्चंद्र जाधव (वय ४०, रा. भिंगळोली आदिवासीवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी दि. २३ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले.

प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी त्यांचे पती हरिश्चंद्र शंकर जाधव हे वाडीत आलेला साप हाकलण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यानंतर अर्चना जाधव यांनी घरातील लोखंडी भाल्याला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. काही वेळाने पती घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने संबंधितांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आमृत्यू नोंद (A.D.) क्रमांक १४/२०२६ अंतर्गत भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.१९ वाजता नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *