Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

संगमेश्वर : तरुणाची विष पिऊन आत्महत्या

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गेल्येवाडी येथील २५ वर्षीय प्रशांत नारायण गेल्ये याचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.४५ वाजता कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. १३ जुलै २०२५ रोजी प्रशांत संगमेश्वर बाजारात गेला असताना त्याने कोणतेतरी अज्ञात विषारी द्रव्य प्राशन केले.

त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने कसबा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हलवले.

परंतु, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला कणकवली, सिंधुदुर्ग येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असतानाच १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.४५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *