Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : पोटदुखीनंतर अचानक तोंडातून फेस उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरातील राजीवडा नाका परिसरातील एका ३९ वर्षीय व्यक्तीचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीर नजीर मुजावर (वय ३९, रा. घर नं. १३८५, राजीवडा नाका, ता. जि. रत्नागिरी) यांना १० जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक पोटात दुखू लागल्याने ते घरीच विश्रांती घेत होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि मानसिक स्थितीही बिघडल्याने ते गावात इकडे-तिकडे फिरत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

काही वेळानंतर ते त्यांच्या बहीण नरजहाँ नरुद्दीन बड्ये यांच्या घरी झोपण्यासाठी गेले. तेथे झोपल्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि ते अचानक बेशुद्ध पडले. ही बाब लक्षात येताच बहिणीने तातडीने नातेवाईकांना माहिती दिली.

त्यानंतर नातेवाईकांनी जमीर मुजावर यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७३/२०२६ म्हणून करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *